नमिता मोटर्समार्फत विक्रीसाठी दाखल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जगामध्ये प्रसिध्द असलेल्या चेतक कंपनीच्या 2901 ब्लू लाईन या पंचरंगी इलेक्ट्रीक दुचाकी दाखल झाल्या आहेत. अलिबागमधील नमिता मोटर्समध्ये या दुचाकी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या असून त्यांचा शुभारंभ शनिवारी (दि.6) सायंकाळी व्यावसायिक विश्वास म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. नमिता मोटर्सचे पार्टनर माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, पार्टनर शैलेश नाईक यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. दरम्यान, या नव्याने दाखल झालेल्या दुचाकी पाहण्यासाठी ग्राहकांनी नमिता मोटर्समध्ये प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी व्यवस्थापक श्रध्दा जाधव, नमिता मोटर्सचे कर्मचारी व शंभरहून अधिक नागरिक उपस्थित होते. 2901 ब्लू लाईन ही दुचाकी आगळ्या वेगळ्या रंगात व रुपात उपलब्ध आहेत. यात सायबर व्हाईट, रेड, ब्लॅक, लाईम यल्लो, अजूर ब्लू या पाच रंगाच्या दुचाकी अलिबाग येथील नमिता मोटर्समध्ये उपलब्ध आहेत. अलिबाग, पेण, रोहा परिसरातील असंख्य ग्राहकांनी या नव्या दुचाकीची खरेदी केली आहे. तसेच, 2901 ब्लू लाईन ही नवीन दुचाकी खरेदी करण्याचा पहिला मान अलिबागमधील ग्राहक शैलेश मराठे यांना मिळाला असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे.
या दुचाकीची रेंज 123 किलोमीटर असून वेग ताशी 63 किलोमीटर इतका आहे. तसेच, या दुचाकीला तीन वर्षे वॉरंटी, स्टील बॉडी, सहा तासात शंभर टक्के चार्जिंग, ड्रम ब्रेक, मर्यादीत अॅप कनेक्टीव्हीटी असून या दुचाकीची किंमत सुमारे एक लाख रुपये इतकी आहे. 2901 ब्लू लाईन दुचाकी खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्सची व्यवस्था असून www.chetak.com या लिंकवर दुचाकी बुकींगची सोय केली असल्याचे शैलेश नाईक यांनी सांगितले आहे.