संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन

। मुंबई । प्रतिनिधी ।
जगद्विख्यात संतूरवादक, संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे पं. शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी (दि.१० मे) सकाळी हृदयविकाराने निधन झाले आहे. यावेळी ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे.

भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान खूप मोठे होते. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे.

Exit mobile version