पांडुरंग ठाकूर यांचे निधन

। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील सानेगावचे रहिवासी असलेले कृषीनिष्ठ शेतकरी व उत्कृष्ट बैलगाडी चालक पांडुरंग नारायण ठाकूर यांचे दि.28 जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते 90 वर्षांचे होते. ते तालुका कुणबी समाज सचिव सुनील ठाकूर यांचे चुलते होत. पांडुरंग ठाकूर यांचा बैलगाडी व्यवसाय हा शेतीला जोडधंदा होता. पूर्वी जंगल भागातील मालकीच्या जागेत जंगलतोड केली जायची. अशावेळेस लाकडांची वाहतूक करणे जिकिरीचे असायचे. अशा जिकिरीच्या कामात त्यांची बैलगाडी हमखास वाहतुकीसाठी चालत असे. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी शनिवार, दि.6 ऑगस्ट रोजी सानेगाव महादेव मंदिर येथे, तर अंतिम धार्मिक विधी मंगळवार, दि.9 ऑगस्ट रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version