। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंडीत मंगळवारी बिबट्याचे दर्शन घडविणारा व्हिडिओ व्हायरल झाला. अनेकांनी कार्लेखिंंडीत बिबट्या असल्याचे सांगितले. मात्र सदर वृत्ताची खात्री केली असता सदर व्हिडीओ महाड येथील वरंध घाटात मागील महिन्यात दिसलेल्या बिबट्याचे असल्याचे समोर आले आहे. तथापि अलिबाग तालुक्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओने चांगलीच घबराट पसरली होती.