अंगार है,भंगार है च्या घोषणांमुळे पंकजा मुंढेंनी कार्यकर्त्याना झापले

बीड | प्रतिनिधी |
केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये सुरु करण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेत पंकजा ताई अंगार है,बाकी सब भंगार है,अशा घोषणा देणार्‍या भाजप कार्यकर्त्यांना माजी मंत्री पंकजा मुंढे यांनी भर रस्त्यातच झापले.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी न देता भाजपाचे नेते भागवत कराड यांना मंत्रीपदाची देण्यात आलं. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं समोर आलं होतं. कार्यकर्त्यांमध्ये यामुळे मोठा रोष निर्माण झाला होता. अद्यापही प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. याचाच प्रत्यय भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये आला.
नवनियुक्त मंत्री भागवत कराड यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी 16 ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात केली आहे. भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा गोपीथनाथ गडावरुन सुरु झाली. यावेळी भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि यात्रेला सुरुवात केली. यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी बीडमधील परळीतून या यात्रेला सुरूवात केली. प्रीतम मुंडेंना मंत्रीपद न मिळल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. यावेळी यात्रे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत जोरदार जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती.

मी शिकवलं आहे का तुम्हाला असं वागायला. मुंडे साहेब अमर रहे या घोषणा आम्ही रोखू शकत नाही. काय अंगार-भंगार घोषणा लावलीय? दुसर्‍या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे का? मला शोभत नाही हे वागणं. जेवढ्या उंचीची मी तेवढी लायकी ठेवा स्वत:ची नाहीतर मला भेटायला यायचं नाही.
पंकजा मुंडे, भाजप नेत्या

Exit mobile version