पंतवर एका सामन्याची बंदी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतसाठी आयपीएल 2024 मधील टेन्शन कमी काय होत नाही. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात संघाने अतिशय लाजिरवाणी कामगिरी केली. या सामन्यात दिल्लीचा 106 धावांनी पराभव झाला. त्याचबरोबर आता बीसीसीआयनेही पंतवर मोठी कारवाई केली आहे.

स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने ऋषभ पंतवर कारवाई केली आहे. या मोसमात ऋषभ पंतला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. त्याचवेळी, मागील सामन्यात ऋषभ पंतवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीला या दोन्ही सामन्यांमध्ये नियमित वेळेत 20 षटकेही पूर्ण करता आली नाहीत. त्याचवेळी, यावेळी पंतसह संघातील इतर खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे.

Exit mobile version