स्केटिंगमध्ये पनवेलचे खेळाडू चमकले

तुर्या नाईकची दोन सुवर्णपदकांची कमाई


| पनवेल | प्रतिनिधी |

फर्स्ट रोलर ॲथलेटिक्स नवी मुंबई जिल्हा चॅम्पियनशिप 2023 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलमधील टी 75 रोलर स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी बाजी मारली. स्पर्धेत तुर्या प्रणाली नाईक हिने दोन सुवर्णपदके पटकावली. यासह विनीत जाधव, आहना सोळंकी, काव्यांश राजपुरोहित, अद्विका भोसले, दिव्याश सुर्वे, संवी पाटील, चिन्मय शिरखे यांनी दोन सुवर्णपदके, 10 कांस्यपदके व दोन रौप्यपदके मिळवून पनवेलचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे.

या खेळाडूंना प्रशिक्षक रायगडभूषण आणि महाराष्ट्र संघाचे कर्णधार प्रसाद ढवळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तुर्या हिच्या यशात आजोबा प्रल्हाद नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. तुर्याचे वय अवघे चार वर्षे असून, ती अडीच वर्षांपासून स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी 2023-24 स्पर्धेत घणसोली येथे पार पडलेल्या स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी केली असून, तिची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली होती.

Exit mobile version