पनवेल शहर पोलिसांनी केला गांजा हस्तगत

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा हस्तगत केला असून, या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील सोसायटी नाका ब्रिज खाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि पटेल, पोलीस उपनि विनोद लभडे, पो.हवा योगेश दिवेकर, पोहवा परेश म्हात्रे, अविनाश गंथडे, विनोद देशमुख, महेंद्र वायकर, पो. ना. सम्राट डाकी आदींचे पथक ग्रस्त घालीत असताना या ठिकाणी आरोपी कुमार तीपा रेड्डी (40) धंदा- गांजा विक्री, रा. इंदिरानगर झोपडपट्टी पनवेल हा संशयस्पदरित्या फिरताना आढल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या कडे 16,500 रुपये किमतीचा 825 ग्राम गांजा हा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. व त्याच्या विरोधात एनडीपीएस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version