। पनवेल । वार्ताहर ।
बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेला गांजा साठा तळोजा परिसरातून गुन्हेशाखेच्या पथकाने हस्तगत केला आहे. तळोजा कल्याण मार्गावर झोपडपट्टीमध्ये गांजा विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. यावेळी पाहणीमध्ये एका झोपडीत दत्ता पवार (29) हा गांजा विक्री करताना आढळून आला त्याच्याकडून 14 हजार रुपये किमतीचा 560ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.