क्योशी विजय तांबडकर यांचा स्तुत्य उपक्रम
। कोर्लई । वार्ताहर ।
क्रीडा क्षेत्रात कराटे शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असून, आधुनिक युगात कराटे प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. मुंबईसारख्या ठिकाणी गेली एकोणचाळीस वर्षे कराटेवर अधिराज्य गाजवणारे आणि मुरुड तालुक्यात तीन दशकांची यशस्वी कारकीर्द असलेले नांदगाव येथील व्यक्तिमत्त्व क्योशी मास्टर विजय चंद्रकांत तांबडकर (सातवा डॉन मास्टर डिग्री) यांनी कराटे शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा असलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना त्रिदशकपूर्तीनिमित्ताने नांदगाव व मुरुडमध्ये जुलै 2022 पासून तीन महिन्यांचे मोफत कराटे प्रशिक्षण घेण्यात दालन खुले करून दिले आहे.
यामध्ये प्रशिक्षण तासिका 25 असून, यात स्व सुरक्षा, आक्रमक व बचाव कौशल्य असणार आहे. हे प्रशिक्षण मोफत घेण्यात येणार असले तरी नोंदणी शुल्क लागू असून, प्रशिक्षण नांदगाव यशवंत नगर छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय व सर.एस.ए. हायस्कूल येथे आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7208400201 साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.