Mumbai Local Breaking: पनवेल लोकलचा डब्बा घसरून अपघात; वाहतूक विस्कळीत

। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) स्थानकात लोकलचा अपघात झाला. पनवेल लोकल प्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्याने अपघात झाला. यामुळे पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे.

सीएसएमटी (CSMT) स्थानकात केवळ 2 प्लॅटफॉर्म हार्बर मार्गासाठी (Harbour Line) आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्याने एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल गाड्यांच्या खोळंबा होऊन वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी CSMT वरुन पनवेलला जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील लोकल पुढे जाण्याऐवजी मागे येऊन बफरला धडकली. सुदैवाने या अपघातात कोणलाही दुखापत झाली नाही. यामध्ये लोकलचा मागून चौथा कोच रुळावरुन घसरला आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

CSMT वर हार्बर मार्गासाठी असलेल्या दोन प्लॅटफॉर्मपैकी प्लॅटफॉर्म क्रमांक १ पुन्हा रुळावर येईपर्यंत बंद राहणार असून प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

Exit mobile version