। पोयनाड । प्रतिनिधी ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित चौदा वर्षा खालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघांनी भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण संघाचा पराभव करत अंतिम विजयी संघ म्हणून मान मिळवला आहे.
अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून 5 बळी घेणार्या अनिष निमसेला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट फलंदाज भेंडखळ उरण संघाचा फलंदाज निर्जर पाटील, उत्कृष्ठ गोलंदाज पनवेल संघाचा अनिष निमसे, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक निलंय सावंत तर मालिकावीर पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा क्रिश पाटील याला गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड प्रीमियर लिगचे अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड.प्रथमेश पाटील, अॅड.गौरव लेले, निहाल अग्रवाल, पलाश चवरकर, लवाज लुब्रिकन्ट्सचे मालक रतन खारोल, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शंकर दळवी, संदिप पाटील, सागर कांबळे, सुहास हिरवे, सुयोग चौधरी पंचायात सदस्य किशोर जैन, जितेंद्र जैन, अभय घरत, झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, खजिनदार दिपक साळवी, सदस्य अजय टेमकर आदी मान्यवर उपस्थित होती.