जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन परहूर गावातील व परिसरातील असंख्य युवा कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात सामील झाले आहेत. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यामुळे चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या विजयाची नांदी स्पष्ट झाल्याचे चित्र आहे.
यावेळी सुरेश घरत, प्रकाश म्हात्रे, संजय माळी, सुरेश गजने, कैलास गजने, जे.पी. घरत, विनोद खोपकर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण वर्ग उपस्थित होते. परहूर येथील प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शेतकरी कामगार पक्षच विकास करू शकतो, हा विचार मनात घेऊन असंख्य तरुण शेतकरी कामगार पक्षात दाखल झाले आहेत. युवा पिढी शेकापमध्ये येऊ लागल्याने या निवडणुकीत विजय निश्चितच होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.