| पाली | वार्ताहर |
खोपोली राज्य महामार्गावर नाणोसे गावानजीक दि.7 रोजी मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट कारला मोठा अपघात झाला. खोपोलीहून पालीच्या दिशेने जात असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात कोसळली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, गाडीचे नुकसान झाले. खोपोलीहून पालीच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कार चालकाचा नाणोसे गावच्या हद्दीत अचानक गाडीवरचा ताबा सुटला व गाडी रस्तालगत असलेल्या लोखंडी खांबाला धडकून थेट खड्ड्यात जाऊन कोसळली. या कारमध्ये दोन तरुण युवक, महिलेसह दोन लहान मुले होती. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.