। आंबेत । वार्ताहर ।
अति मुसळधार पावसात कोकणची न भरून निघणारी हानी झाली आणि यामध्ये अतोनात नुकसान देखील झालं,कुठे रस्ते वाहून गेले तर कुठे घरे अशातच म्हसळा तालुक्यातील पांगलोली परिसरात असलेल्या एका मुख्य रस्त्यावरील मोरीचा भाग देखील या पावसात खचल्याने रस्त्याला भल मोठं भगदाड पडलं आहे या प्रकारामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे,सद्या या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू असली तरी भविष्यात या परिसरात अपघात घडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे, मुख्य वळणाचा भाग असल्याने समोरील वाहन खचलेल्या रस्त्यात जाण्याची भीती देखील सांगण्यात आली आहे,दोन वर्षांपूर्वीच या मोरीचा नव्याने बांधण्यात आलेला भाग खचतोच कसा असा सवाल आता नागरिक तसेच प्रवाशी वर्गाकडून उपस्थित होतोय, त्यामुळे अशा बोगस ठेकेदारांची मनमानी सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचं चित्र समोर आलंय, दुसरीकडे आंबेत पांगलोली या राज्यमार्गावरील झाडी झुडपांचा भाग देखीळ रस्त्यावर आल्याने या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा मोठ्या अपघातांना येथील प्रवाशांना सामोरे जावे लागणार आहे,वाढलेली झुडपे ही रस्त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त भागात पोहचल्याने समोरून येणार वाहन हे न दिसू येत असल्याने आपला जीव मुठीत घेऊन प्रवाशी वर्गाला प्रवास करावा लागत आहे,त्यामुळे लवकरात लवकर या समस्यांचे काम मार्गी लावण्यात यावं अशी विनंती आता येथील स्थानिक नागरिकांडून होताना दिसत आहे.