। सुकेळी । वार्ताहर ।
ऐनघर विभागीय असोसिएशन यांच्या वतीने देखिल विभागीय प्रिमियर लीग 2022 च्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवार दि.12-13 मार्च रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विजयी ठरला तो पार्थ इलेव्हन कानसई संघ तर शौर्य इलेव्हन हेदवली या संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे उद्घाटन कलावती राजेंद्र कोकले व सुधिर ढाणे याच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना रंगला तो पार्थ इलेव्हन संघ कानसई व शौर्य इलेव्हन संघ हेदवली. या अटितटिच्या सामन्यात पार्थ इलेव्हन संघाने बाजी मारत विभागीय प्रिमियर लीग 2022 च्या चषकाचा मानकरी ठरला. या संघास चषक व रोख रक्कम रु. 25, 000 देण्यात आले. तर शौर्य इलेव्हन या संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानत आकर्षक चषक व रोख रक्कम रु.20,000 देण्यात आले. तृतीय क्रमांक देवांश इलेव्हन तामसोली व चतुर्थ क्रमांक खाडे फायटर सुकेळी या संघाने पटकावला. त्याचप्रमाणे मॅन ऑफ दि सिरिज कैलास पवार व पब्लिक हिरो आणि सिक्सर किंग अनिकेत कापरे यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या बक्षिस वितरण समारंभाला रोहिदास लाड, मनोहर सुटे, सुधिर ढाणे, निवास पवार, किशोर नावले, जगन कोकले, विठ्ठल इंदुलकर, सचिन भोसले, भास्कर बावदाने आदि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







