स्वच्छ सागर अभियान सहभागी व्हा

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियान अंतर्गत महास्वच्छता मोहीमेत मुरुड समुद्रकिनारी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांनी केले.

स्वच्छ सागर, सुरक्षित सागर,/स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र ही 75 दिवसांची मोहीम 17 सष्टेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी देशभरातून चिन्हीत करण्यात आलेल्या 75 समुद्र किनार्‍यांमध्ये मुरुडच्या समुद्र किनार्‍याला चिन्हीत करण्यात आले आहे.

समुद्र किनारी स्वच्छता मोहीम तसेच विविध अनुषंगिक उपक्रम राबविले आहेत. या मोहिमेची 17 सष्टेंबर रोजी सांगता होत आहे. तरी या मोहिमेकरिता नागरिकांनी विश्रामबाग मुरुड येथे उपस्थित राहुन मोहीमेत सक्रीय सहभाग नोंदवावा व समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन भुसे यांनी केले.

Exit mobile version