। उरण । वार्ताहर ।
उरणमधील जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, मोरा व प्राथमिक शाळेत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा प्रारंभ माजी सैनिक संतोष ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांनी झेंडा हातात धरून मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा, वंदे मातरम, मेरा भारत महान, स्वच्छ सागर, सुरक्षित सागर, स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र, अशा घोषणा देत रॅली काढली.
यावेळी परशुराम कोळी, चंद्रकांत कोळी, आर.के. पाटील, ध्रुव कोळी, राजश्री कोळी, नीलम गावंड, मनीषा पाटील, सुधीर मुंबईकर, साईनाथ गावंड, संध्या ठाकूर, स्नेहा पाटील, संदेश गावंड, सुचित्रा चांदोरकर, मनोज म्हात्रे, सुगिंद्र म्हात्रे, स्वप्निल नागमोती, शिक्षिका मंगला शिंदे, सुप्रिया मुंबईकर, सुनीता पाटील, रोहिणी घरत, राणी कदम, रूपाली चौधरी, रेश्मा कोल्हे उपस्थित होते.
कार्यक्रामाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले व व्यवस्था पाहण्याचे काम घनश्याम म्हात्रे, दिनेश पाटील यांनी केले. तसेच साईनाथ गावंड यांनी आभार मानले.