आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

। अलिबाग । वार्ताहर ।
आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरिता आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जि.रायगडमार्फत प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील (जिल्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग) आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता नृत्य पथकांनी दि.8 जून पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालय, पेण येथे अर्ज सादर करावेत. स्पर्धेत भाग घेणार्‍या पथकातील कलाकारांना मानधन, येण्या-जाण्याचा प्रवास खर्च, दैनिक भत्ता, पेहराव भत्ता मिळणार आहे. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी केले आहे.

Exit mobile version