। हरिहरेश्वर । वार्ताहर ।
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम व जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याने या मतदान जनजागृती अभियानात प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील यांनी केले.
मतदान जनजागृती अभियानांतर्गत मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडवणार असे घोषवाक्य लिहिलेल्या फलकावर उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील यांनी प्रथम सही करुन शुभारंभ केल्यानंतर तहसिलदार श्रीवर्धन महेंद्र वाकलेकर, तहसिलदार म्हसळा समीर घारे, तहसिलदार तळा स्वाती पाटील, नायब तहसिलदार रत्नदिप केमनाईक आदी उपस्थित होते.