कार अपघातात प्रवासी जखमी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलच्या दिशेने जाताना हरिग्राम-वाघेऱ्याजवळील पुलाखाली चारचाकी कार कोसळल्याची घटना घडली. यात काही जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात, याच ब्रिजवरून एक कार खाली कोसळली होती. मार्च महिन्यातली ही दुसरी घटना घडली.

पनवेलच्या दिशेने एक चारचाकी कार दुपारी दोनच्या सुमारास जात होती. यावेळी ही नाकार ब्रिजवरून खाली कोसळली. टी या कारमध्ये चौघेजण असल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही जण जखमी झाले, असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. 25 ते 30 दिवसांत दोन कार खाली कोसळल्याने येथील पुलाचा परिसर धोकादायक बनत चालला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही कार पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. महिनाभरात दोन कार खाली कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणो दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. तसेच अपघात होऊ नये म्हणून वाहन चालकांनी सावधानता बाळगायला हवी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version