मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय

| पनवेल | प्रतिनिधी |

मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवारी (दि.22) घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक गाड्या रद्द व उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. पनवेल स्थानकात प्लॅटफॉर्म वाढविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून त्यामुळे काही प्रवाशांनी भर उन्हात रूळ ओलांडत पर्यायी मार्ग निवडल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक ठरत असल्याची चर्चा होती. दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात मोठा पादचारी पूल (ब्रिज) उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे. भविष्यात वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून सुविधा उभारल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version