| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड आगाराची मुरुड-सुपेगाव-रोहा एसटी बस सकाळी 8-30 वा. सुटते. शुक्रवारी (दि.17) ही बस उसरोली ते फणसाड वन्यजीव अभयारण्य दरम्यान आड मार्गावर ब्रेक डाऊन झाली. त्यामुळे रत्नागिरी, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
रोहा, पुणे व रत्नागिरीकडे जाण्यासाठी मुरुड-सुपेगांव मार्गे रोहा हा जवळचा मार्ग आहे. अनेक प्रवासी या मार्गाने ये-जा करणे पसंत करतात. मुरुड-जंजिरा, फणसाड वन्यजीव अभयारण्य पाहाण्यासाठी याठिकाणी पर्यटकांच्या वाहनांची रेलचेल असते. मात्र, शुक्रवारी सकाळच्या वेळेत रोह्याकडे जाणारी एसटी बस उसरोली ते फणसाड अभयारण्य दरम्यान आड मार्गावर ब्रेक डाऊन झाल्याने प्रवाशांना हाल सहन करावा लागला. दरम्यान, एसटी बस सेवेत ब्रेक डाऊनमुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन मुरुड आगार प्रमुखांनी या मार्गावर सुस्थितीत व चांगली सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.







