| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित चौदा वर्षाखालील एकदिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एसबीसी महाड संघाच्या उमंग चौहान याने शतकी खेळी करत 94 चेंडूचा सामना करत 16 चौकाराच्या सहाय्याने 109 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या चौदा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघाने आयडियल क्रिकेट अकॅडमी कामोठे संघावर 129 धावाने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करतांना एसबीसी महाड संघाने 38 षटकात 7 गडी बाद 244 धावा धावफलकावर नोंदवल्या त्यामध्ये सलामीला आलेल्या उमंग चौहानने तुफान फलंदाजी करत शतक ठोकले त्याने 109 धावा काढल्या त्याला अर्णव गायकवाड यांनी 25 व रोहित पाटील यांनी 24 धावा काढून साथ दिली. आयडियल कामोठे संघाकडून तनिष्क बिले यांनी 2 फलंदाज बाद केले. प्रतिउत्तर देताना आयडियल क्रिकेट अकॅडमी कामोठे संघाने 38 षटकात चार गडी गमावत 115 धावा काढल्या त्यामध्ये तनिष्क बिले यांनी सर्वाधिक 39 तर विनय चिकने यांनी 27 धावांचे योगदान संघाला दिले. महाड कडून रियान जोशी, शाहजीब नाईक, समर्थ वाडीले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. एसबीसी क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक आवेश चिचकर, एसबीसी महाडचे संस्थापक अध्यक्ष बशीर चिचकर, अनिल हेलेकर विनायक जाधव, विजय जाधव, ॲड.राजन गायकवाड, संजीव शेठ, राजेश जोशी, संदीप शेठ, अशोक कोकणे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.





