| पातळगंगा | वार्ताहर |
मागील दोन दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे सर्वत्र ठिकाणी पाणीचं पाणी पाहावयास मिळत आहे. दरम्यान, पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, जुने पूल पाण्याखाली गेलेले पाहावयास मिळत आहे.
विशेषतः धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तालुक्याच्या विविध भागात जोर वाढला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे मोठे अवघड झाले आहे. पाऊस क्षणभर विश्रांती घेत असून, पुन्हा त्याच्या सरी जोमाने येत आहे. या पावसामुळे तालुक्यातील बळीराजा सुखावला जरी असला तरी या पावसाने मात्र तालुक्यात दाणादाण उडवून दिली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.