साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्थ
। पेण । प्रतिनिधी ।
पेण उपजिल्हा रुग्णालय आणि हलगर्जीपणा हे समिकरणच जणू काही होउन बसलेले आहे. पेणमध्ये मोठ्या प्रमाणात हीव तापाची आणि डोळ्यांची साथ पसरलेली आहे. पेण येथील खासगी दवाखाने तुडुंब भरलेले असतानाच सर्व सामान्य नागरीक उपजिल्हा रुग्णालयात जात आहेत. परंतु जिल्हा उपरुग्णालयातील बेड पूर्ण भरून आजारी रुग्णांना लादीवर बेड करून झोपवण्याची वेळ आलेली आहे.
याबाबत माहिती घेण्यासाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी वैद्यकीय अधिक्षक संध्या रजपूत यांच्याकडे गेले असता, त्यांनी प्रसार माध्यमांच्या महिला प्रतिनिधींची योग्य वर्तणूक न करता माहिती देण्यास वेळ लागेल, मी कामात आहे, मी इतरांना माहिती देत आहे असे सांगितले. महत्वाची बाब या त्याच संध्या रजपूत आहेत ज्यांच्या हलगर्जीपणामुळे 20 ते 25 दिवसांपूर्वी जिते येथील सारा ठाकूर या चिमूकलीला आपले प्राण गमवावे लागले. पेण उपजिल्हा रुग्णालयात सध्या मोठया प्रमाणात रुग्णांचे हाल सुरू आहे. रुग्णालयात डॉक्टरांचा वानवा आहे. डॉ. सारिका भिडे या गेली दोन दिवस एकट्याच काम करत आहेत. साथीचे आजार एवढया मोठया प्रमाणात असताना जिल्हा चिकित्स्यकांकडून तातडीने डॉक्टरची सोय करणे गरजेचे असताना वैद्यकीय अधिक्षकांना आपली केबिन सोडवेना. प्रसार माध्यमांना योग्य ती माहिती देत नाहीत. जर प्रसार माध्यमांना योग्य माहिती मिळाली तर जिल्हा चिकित्स्यकांकडून तातडीने डॉक्टरांची सोय करता येईल परंतु असे होताना दिसत नाही.
पेण रुग्णालयात एकूण 50 बेड असून हे 50 च्या 50 बेड पूर्ण भरले असून महिला कक्षेमध्ये रुग्णांना अक्षरशः लादीवर गादी टाकून बेड तयार केले आहे. त्यातच पुरेसे डॉक्टर नसल्याने असणार्या डॉक्टरांवर जास्तीचे ताण पडत आहे. गेल्याच आठवडयात वैद्यकीय अधिक्षक संध्या रजपूत यांनी दिलेल्या माहिती नुसार पेण येथे वैद्यकीय अधिकार्यांच्या 7 पैकी 7 जागा भरलेल्या असल्याचे सांगितले. मग डॉक्टरची कमतरता कशी येत आहे. त्यातच डॉक्टर सारिका भिडे यांना 24-24 तास डयूटी कशी करावी लागत आहे, याकडे वैद्यकीय अधिक्षकांचे लक्ष नाही. अथवा आठ दिवसापूर्वी दिलेली माहिती चुकीची होती. आताच्या क्षणाला डॉ.ज्ञानेश्वर अडसळ व डॉ.सारीका भिडे या काम करत आहेत. मात्र डॉ. सारिका भिडे या 24 तास काम करत असल्याने त्यांना अस्वस्थ वाटल्याने त्यांनाच दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली.