। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्यात पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना त्याची अमलबजावणी होत नाही. या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात रायगड प्रेस क्लबच्या सर्व शाखांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात होळी करुन संताप व्यक्त केला.
यावेळी मनोज खांबे, नागेश कुलकर्णी, अनिल भोळे, विजय मोकल, कमलेश ठाकूर, उमाजी केळुसकर, प्रशांत गोपाळे, नागेश कदम, सीमा मोरे, दरवेश पालकर, भारत रांजणकर, भाई ओव्हाळ, रमेश कांबळे, प्रफुल्ल पवार, सचिव ड राजेश भोस्तेकर, पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवराज पार्टे ,नरेश कुशवाह, समाधान दिसले, सुयोग आंग्रे, महेंद्र दूसार, प्रणय पाटील, किशोर सुद, धनंजय कवठेकर आदी उपस्थित होते.
पत्रकारांच्या शिस्टमंडळाने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही गंभीर बाब असून या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी काटेकोरपने व्हावी यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात प्रशिक्षण देवून माहिती देणार असल्याचे सोमनाथ घार्गे यांची सांगितले.