| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचेे चांद्रयान-3 चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. प्रोपल्शन युनिटपासून वेगळे होऊन, विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर लँडिग करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोमध्ये उपस्थित राहणार आहेत.
आता चांद्रयानला फक्त 100 किमी अंतर पूर्ण करायचं आहे. चंद्राच्या चारही बाजूंनी दोन वेळा चक्कर मारल्यानंतर त्याला आपली उंची आणि गती कमी करायची आहे. यानंतर 23 ऑगस्टला संध्याकाळी पावणे सहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.