| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली-मांडला येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अक्षयकुमार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सिकलसेल दिन साजरा करण्यात आला. यावेळी 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ घरडे, आरोग्य सेवक राजेंद्र चुनेकर, मयूर पाटील, तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा, आरोग्य सहाय्यक परीक्षित कोळी, आरोग्य सहाय्यक अमित करमळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मनीषा शेलार, जुतिका गावंड, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी स्थानिक नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा यांनी सिकलसेल आजाराविषयी सविस्तर माहिती सांगितली. ते म्हणाले की, सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्त पेशींचा आकार गोल व लवचिक असतात पेशींचे आयुष्य 120 दिवस असते, पण सिकलसेल आजारामध्ये या पेशींना ऑक्सिजन मिळाला नाही, तर विळयासारखे होतो, सिकलसेल पेशींचे आयुष्य हे 20 ते 30 दिवस असते इंग्रजी भाषेत सिकल म्हणजे विळा सेल म्हणजे पेशी म्हणून ह्या आजारास सिकलसेल आजार असे म्हणतात. सिकलसेल हा लाल पेशीमध्ये होणारा आजार आहे, तरी योग्य वेळी रुग्णांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा यांनी केले.
अशा शैक्षणिक व वैज्ञानिक कार्यक्रमांच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान डॉक्टरांपर्यंत पोहोचविण्याचा कर्जत मेडिकल असोसिएशनचा प्रयत्न सातत्याने सुरू असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.







