नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात शनिवारी एकूण 3 लोकसभा आणि 30 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.यामध्ये महाराष्ट्रातील देगलुर विधानसभा मतदार संघाचाही समावेश होता.प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 50 ते 60 टक्के मतदान झाले. या 30 विधानसभा जागांमध्ये 14 राज्यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 5 जागा आसामच्या, 4 पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी 3, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी 2 आणि आंध्र प्रदेश, तेलंगाणा हरियाणा, मिझोराम, नागालँडमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. मतमोजणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.