नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठवड्यात सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमतींमध्ये 35 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 108.99 रुपये प्रति लिटर, मुंबईत 114.81 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, दिल्लीत डिझेल 97.72 रुपये प्रति लिटर आणि मुंबईत 105.86 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. बालाघाटमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 120.06 रुपये आहे. तर डिझेल 109.32 रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वाहनांच्या इंधनाच्या दरात वाढ झाल्याने जनता हैराण झाली आहे