वीजेच्या धक्क्याने मोराचा मृत्यू

नेरळ हुतात्मा चौकातील घटना

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ येथील हुतात्मा चौक परिसरातून टाटा कंपनीची वीज वाहिनी जाते. त्या भागातील फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी भागात मोठ्या प्रमाणात मोरांचा संचार असतो. त्यातील एका मोराची वीज वाहिनीला धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत झालेला पक्षी हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्या पक्षावर शासकीय नियमानुसार अंतिम विधी करण्यात आले. फॉरेस्ट टेकडी येथून हा मोर मोरोशी भागाकडे जात असताना तेथून वाहणार्‍या टाटा कंपनीच्या वीज वाहक तारांना धडकला. त्या धडकेत मोर जमिनीवर कोसळला. त्यावेळी हुतात्मा चौकात असलेले नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाळू लिये आणि नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे कार्यकर्ते किशोर भोईर यांनी त्याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर तात्काळ वन कर्मचारी हे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी मोराला उचलून टॅक्सी स्टँड कार्यालयात आणले.

Exit mobile version