। उरण । वार्ताहर ।
पनवेल शेकाप कार्यालयात वावंजे, नेरे, पालीदेवद, विचुंबे, वावेघर, पळस्पे, वडघर, गव्हाण, केळवणे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठक आ. बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीला पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, नारायण घरत, काशिनाथ पाटील, तालुका चिटणीस राजेश केणी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील. प्रत्येक मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.