। उरण । वार्ताहर ।
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीचे संस्थापक तथा नेते शरद पवार यांच्यावर नेहमी खालच्या भाषेत टिका करतात विविध बेताल वक्तव्ये करतात त्यामुळे त्यांचा निषेध म्हणून उरण तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला नेत्या भावना घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मुळेखंड तेलीपाडा येथे शहराध्यक्ष गणेश नलावडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. उरणमध्ये एका कार्यक्रमा निमित्त भाजप नेते गोपीचंद पडळकर येणार असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तेलीपाडा येथे पडळकरांना झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी अॅड. भार्गव पाटील, कैलास भोईर, प्रकाश म्हात्रे, सचिन पाटील, सनी म्हात्रे, वैभव कडू आदी राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.