| पनवेल | वार्ताहर |
राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने रस्त्यावर एका पादचार्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कळंबोली सर्कल ते देवांशी इन हॉटेल येथील रस्त्यावर रात्री साडेदहा वाजता हा अपघात घडला. जगत हरदेव विश्वकर्मा असे मृताचे नाव आहे. राज्य परिवहन महामंडळाची एसटीबस घेऊन चालक भरत सिंग राजपूत हे भरधाव वेगाने आणि रस्त्याकडे दुर्लक्ष करून बस चालवित होते. कळंबोली येथील देवांशी इन हॉटेलसमोरील पादचारी हरदेव याला ठोकर दिल्यानंतर चालक भरत सिंग ठाकूर तिथून पळाले. प्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अमोल शेलार यांनी याबाबत कायदेशीर तक्रार दिल्यावर एसटी चालक भरत सिंग याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.