| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात पादचारी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकाच रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पादचारी महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. यातील पहिली घटना खारघर उपनगरामध्ये सायंकाळच्या सुमारास उत्सव चौकाशेजारील रस्त्यावर घडली. तर दुसरी घटना त्याच रात्रीच्या वेळी नवीन पनवेल येथे शिवा कॉम्प्लेक्स समोरील रस्त्यावर रात्री सव्वा अकरा वाजता घडली. दोन्ही घटनांमध्ये अडीच लाख रुपये किमतीचे सोने चोरट्यांनी चोरून नेले. पहिल्या घटनेत खारघर येथील महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी घेऊन दुचाकीवरून आलेला चोर पसार झाला. तर दुसर्या घटनेत एक लाख 60 हजाराांचे मंगळसूत्र घेऊन चोरटे पसार झाले.