ट्रकच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।
भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने पायी चालत जाणार्‍या इसमास धडक दिली. यात 26 वर्षीय अमीर मालो कांधो (देवीचा पाडा) याचा मृत्यू झाला. आरोपीविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर कांधो हा वावंजे-पनवेल रोडवर देवीचापाडा येथून जात होता. यावेळी हायवा ट्रक एमएच 43 वाय 2338 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील हायवा भरधाव वेगाने चालवली व आमीर याला पाठीमागून धडक दिली. या धडकेत आमिर कांधो याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी हायवा चालक पळून गेला आहे.

Exit mobile version