कार अपघातात पादचारी महिला जखमी

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खांदेश्वर पोलीस ठाणेहद्दीत एका कारचा अपघात झाला असून या अपघातात पादचारी महिला महिला जखमी झाली आहे. कारवरील चालक दिलीप उदय राणी (44) हे त्यांचे ताब्यातील कार चालवीत घेऊन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबई बाजूकडे जात असताना अर्चना महादेव माने (40) रा. विचुंबे ही पादचारी महिला मुंबई पुणे लेनकडे पायी चालत रोड क्रॉस करत होती. यावेळी कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून अर्चना महादेव माने यांना ठोकर लागून गंभीर दुखापत झाली आहे. सदर अपघातामध्ये महिला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे खाजगी वाहनाने दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version