नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील अनेक राजकीय नेते, पत्रकार यांच्यावर पेगाससद्वारे पाळत ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशा मागणीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात निकाल जाहीर करणार आहे. विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरणावरून संसदेमध्ये देखील गदारोळ घातला होता. केंद्र सरकार पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. यापूर्वी 13 सप्टेंबरला सुनावणी घेण्यात आली होती.