| पेण | प्रतिनिधी |
पोलीस असल्याचा बहाणा करुन एका युवतीवर शारीरिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन रामवाडी येथील प्रशांत पाटील यास पेण पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालक प्रशांत पाटीलने मी पोलीस आहे असे धमकावून फिर्यादी पिडीत तरुणी व साक्षीदार यांना जबरदस्तीने आपल्या रिक्षात बसवून त्यांचे मोबाईल काढून घेउन त्यांना धामणी येथील एका बंद पडलेल्या कंपनीत नेऊन तेथे अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच कारवाई करण्यात आली.
आरोपी मुळचा काळेश्री गावचा रहिवासी आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस सहाय्यक निरीक्षक एम.जे. घाडगे या तपास करीत आहेत.