पेण बाजार समिती निवडणूक अस्तित्वासाठीची लढाई

| पेण | प्रतिनिधी |

पेण कृषी उत्पन बाजार समितीच्या 18 जागांपैकी 17 जागांसाठी रविवारी (दि.30) मतदान होत असून ही लढाई अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिले जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाजार समितीवर निविर्वाद वर्चस्व राहिले असून यावेळी, शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये लढत पहायला मिळणार आहे.

रायगड मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा ज्येष्ठ शेकाप नेते पी.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाणार आहे. तर माजी आ. धैर्यशील पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने बाजार समितीचे जुने चेहरे या निवडणूक रिंगणात उतरल्याचे पहायला मिळणार आहेत. यामध्ये शेकापचा सहकार क्षेत्रावर असलेले वर्चस्व पी.डी.पाटील यांना उपयोगी पडणार आहे.

सहकार क्षेत्रामध्ये एकूण 367 मत असून 11 जागांपैकी 1 जागा बिनविरोध निवडून आलेली आहे. 10 जागांसाठी  मतदान होणार आहे. तर ग्रामपंचायत विभागामध्ये 4 जागांसाठी निवडणूक होणार असून यामध्ये एकूण 9 उमेदवार आहेत. मतदार संख्या 625 एवढी आहे. तर अडते व्यापारी याविभागातून 2 उमेदवार निवडून दयायचे आहेत. यामध्ये एकूण 6 उमेदवार उभे असून एकूण मतदार संख्या 317 एवढी आहे तर हमाल व तोलारी या विभागातून एक उमेदवार निवडून दयायचा आहे यासाठी दोन उमेदवार उभे असून मतदार संख्या ही 52 एवढी आहे.

Exit mobile version