पेट्रोल डिझेलच्या किमतींना पुन्हा उसळी! १२ दिवसात दहाव्यांदा किंमत वाढली

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने असलेल्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतींना पुन्हा उसळी आली असून, गेल्या १२ दिवसात दहाव्यांदा पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. 2 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वाहनांच्या इंधनामध्ये प्रति लिटर 80-80 पैशांनी वाढ केली आहे.

प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर –
दिल्ली
पेट्रोल – 102.61 रुपये प्रति लिटर
डिझेल – 93.87 रुपये प्रति लिटर
मुंबई
पेट्रोल – 117.57 रुपये प्रति लिटर
डिझेल – 101.79 रुपये प्रति लिटर
कोलकाता
पेट्रोल – 112.19 रुपये प्रति लिटर
डिझेल – 97.02 रुपये प्रति लिटर

Exit mobile version