फडके विद्यालयात प्रवेशोत्सव

| पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील शिरढोण येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शासनाच्या मोफत शैक्षणिक पुस्तक वाटप योजनेंतर्गत पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुर्यवंशी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच येथील शिक्षक गुंजाळ यांच्या आईंच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वही व इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना बिस्कीट व केळी वाटप करण्यात आली. यंदा दहावीचा 92.86 टक्के निकाल लागल्यामुळे संस्थेच्या वतीने शाळा समिती प्रमुख, सदस्य, पालक व माजी विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक, शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version