फणसवाडी, चाफेवाडी पाडा दरडग्रस्त गाव घोषित

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। पनवेल । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागातर्फे खारघर डोंगरावरील फणसवाडी, चाफेवाडी आदिवासी पाड्यांना दरडग्रस्त गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. खारघर परिसरातील दरडग्रस्त गाव घोषित करण्यासाठी आपत्कालीन समिती असून, या समितीमध्ये स्थानिक नगरसेविका मिनल पाटील, लीना गरड, नगरसेवक उत्तम मोर्वेकर, शत्रुघ्न काकडे, तलाठी शीतल वाघ, पनवेल महापालिका अधिकारी जितेंद्र मढवी आणि आपदा मित्र अनिकेत चौगुले आदी व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, नगरसेविका मिनल पाटील यांनी फणसवाडी, चाफेवाडी आदिवासी पाड्यात भेट देऊन ग्रामस्थांना फणसवाडी, चाफेवाडी आदिवासी पाड्याचा दरडग्रस्त गावात समावेश झाल्याची माहिती दिली.

Exit mobile version