भेंडखळ क्रिकेट अकॅडमीतर्फे शारीरिक प्रशिक्षण

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील भेंडखळ क्रिकेट अकॅडमीमार्फत पाणदिवे येथील पुंडलिक रामा पाटील इंग्लिश मिडीयम शाळेच्या सभागृहात अकॅडमीच्या युवा खेळांडूसाठी शारीरिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. २६ जून रोजी करण्यात आले होते. बीसीसीआयचे लेव्हल २ फिजिकल ट्रेनर (शारीरिक प्रशिक्षक) युवराज साळवी यांनी शिबिरामध्ये मुख्य मार्गदर्शन केले. साळवी सध्या आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स संघासाठी फिटनेस ट्रेनर म्हणून काम करीत आहेत.

शारीरिक प्रशिक्षणाबाबत विविध प्रात्यक्षिके, व्यायामाचे विविध प्रकार, ड्रील्स युवराज साळवी व त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक तिवारी यांनी करून दाखविले व खेळाडूंना करायला सांगितले. क्रिकेट खेळ खेळण्यापूर्वी वॉर्मउप कसा, कधी आणि किती वेळ करावा त्याने काय फायदा खेळाडूंना होतो, याचे मार्गदर्शन साळवी यांच्याकडून करण्यात आले.
या शिबिरासाठी भेंडखळ क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज भगत, पुंडलिक रामा पाटील इंग्लिश मिडियम शाळेचे संचालक प्रकाश पाटील, भेंडखळ क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक नयन कट्टा,अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. भूषण पाटील, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारणी मंडळाचे सदस्य अ‍ॅड. पंकज पंडित, सहाय्यक प्रशिक्षक शरद म्हात्रे, विशाल ठाकूर व बीसीसीचे पदाधिकारी भूषण ठाकूर तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version