खाडीकिनार्‍यावर डेब्रिजचे ढीग

| नवीन पनवेल । वार्ताहर ।
रांजणपाडा गावाकडून वास्तुविहार सेलिब्रेशनकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला दिवसाढवळ्या डेब्रिज टाकले जात आहे. या प्रकाराकडे पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. रांजणपाडा गावाकडून वास्तुविहार सेलिब्रेशनकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला दिवसाढवळ्या डेब्रिज टाकण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांकडे याबाबत विचारणा केली असता अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून बाहेरून आणलेल्या डेब्रिजमुळे होल्डिंग पाँड बुजवण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे खारघरमधील खाडी परिसरातील डेब्रिज माफियांचा वावर पुन्हा वाढला असून पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून याकडे कानाडोळा होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

बाहेरून ट्रकद्वारे डेब्रिज आणून प्रथम रस्त्याचा कडेला टाकण्यात येत आहे. त्यानंतर जेसीबीने खाडीत ढकलले जात आहे. त्यामुळे पालिकेने तात्काळ या डम्पर मालकांवर कारवाई करण्याची गरज आहे. – वैभव आवारी, रहिवासी

– वैभव आवारी, रहिवासी


खाडी किनार्‍यालगत टाकण्यात येणार्‍या डेब्रिजची पाहणी करण्यात येईल. तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

– जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर
Exit mobile version