| कोलाड | प्रतिनिधी |
परतीचा पाऊस दोन दिवसापासून नाहीसा झाल्यामुळे रोहा तालुक्यात गुलाबी थंडी पडू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गुलाबी थंडी म्हणजे सुखदायक आणि आल्हादायक गारवा. जो विशेषता हिवाळ्याच्या सुरुवातीला अनुभवला जातो. जेव्हा तापमान खूप कमी नसते; पण हवेत गारवा असतो. या थंडीमध्ये सकाळी थंडी असते. पण दुपारी ऊन पडते यामुळे वातावरण आल्हादायक बनते. गुलाबी थंडी साधारण नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते ती आरोग्यासाठी चांगली मानली जाते. पण या ऋतुत शरीरातील रुक्षता आणि कोरडेपणा वाढतो. गुलाबी थंडीत शरीराची काळजी घेणे गरजेचे असते. या ऋतुत ढगाळ वातावरण, पाऊस आणि वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलामुळे विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे आहारात थोडे पालट करणे महत्वाचे आहे. यामुळे गुलाबी थंडी जरी शरीराला अल्हाहदायक असली तरी काळजी घेणे तेवढेच महत्वाचे आहे.







