धाटाव एमआयडीसीत सव्वा लाखांचे पाईप चोरीस

। धाटाव । वार्ताहर ।
धाटाव औद्योगिक वसाहतीत पोलीस ठाण्यानजीकच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात 1 लाख 8 हजारांची चोरी झाली आहे. याठिकाणी सुरू असलेल्या एका प्रकल्पाच्या कामासाठी आणलेले 8 पाईप अज्ञात इसमाने चोरून नेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रेशन टाकीच्या एका प्रकल्पाच्या कामासाठी आणलेले 100 एनबीचे 48 मीटर लांबीचे 2262 रुपयांप्रमाणे 1 लाख 8 हजार रुपये किमतीचे एकूण 8 नग कंपनीच्या पूर्व बाजूस मोकळ्या जागेतून कोणीतरी अज्ञात इसमाने गायब केले. याबाबत प्रसाद दीपक राईज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Exit mobile version