जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायत निवडणूक
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होत असून त्यासाठी आजपासून अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. मात्र पितृपक्ष असल्याने पहिल्याच दिवशी जिल्ह्यातून एकही अर्ज भरण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यातील 20 ग्रमापंचायतींमध्ये अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.येथील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अलिबाग तालुक्यातील वेश्वी, नवेदर नवगाव, कोप्रोली, कर्जत तालुक्यातील पोटल, पाली तर्फे कथल खलाटी, खालापूर तालुक्यातील चौक, आसरे, लोधीवली, तूपगाव, पनवेल तालुक्यातील खेरणे, पेण तालुक्यातील कोपर, पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खोडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, वझरवाडी, महाड तालुक्यातील खरवली, माणगाव तालुक्यातील देगाव, पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द तसेच श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव या ग्रामपंचायतीं मध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे 21 ते 27 सप्टेंबर अर्ज भरणे, छाननी 28 सप्टेंबर, माघार 30 सप्टेंबर तर मतदान 13 ऑक्टोबर रोजी होऊन मतमोजणी 14 ऑक्टोबरला होणार आहे.