वरसगाव पेट्रोलपंपासमोर खड्डेच खड्डे

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
पहिल्याच पावसात वरसगाव येथील पेट्रोल पंपासमोरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून जागोजागी खड्ड्यांनी रिंगण केलेले दिसत आहे. हा रस्ता मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील असून पहिल्याच पावसात या महामार्गावरील रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली रस्त्यात खड्डे कि खड्डयात रस्ते अशी झाली असून यामुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

या महामार्गावरून सातत्याने लहान-मोठी तसेच अवजड वाहनं जात असतात त्यामुळे येथील रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक आहे परंतु दरवर्षी पहिल्याच पावसात येथील रस्त्याची धुलाई होत असते. वरसगाव येथील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा सुद्धा लागत आहेत. आता कुठे पावसाला सुरुवात झाली असून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करणे कठीण झाले आहे. या चौपादरीकरणाचे काम 12 वर्षापासुन सुरु असून कामात कोणतेही प्रगती नाही परंतु वरसगांव पेट्रोल पंपा समोर एवढे जीवघेणे खड्डे पडलेले आहेत.यातून मार्ग काढतांना प्रवाश्यांची दमछाक होते.यामुळे प्रवाशाना कंबरदुखी, मणक्याचे आजार जाणवत असून यातुन मार्ग काढताना मोठा अपघात होऊ शकतो, त्याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया कोलाड कुणबी समाजाचे सचिव संतोष निकम यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version